भिगवण हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव महत्त्वाचे आहे. इंदापूर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ व जवळपास सर्वच सुविधा असलेल्या या गावातील लोकसंख्या ही इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक असून पर्यटन क्षेत्र व मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सर्वाधिक प्रमाणात अग्रेसर असणारे गाव आहे. भिगवण गाव शेजारीच काही अंतरावर असणारे भिगवण रेल्वे स्टेशन सुद्धा तेवढेच मोलाचे असून यामुळे करमाळा, जेऊर, जिंती, पारवडी, सोलापूर, विजापूर, हैदराबाद, तिरुपती व दक्षिणेकडील रेल्वे प्रवास करता येतो.
भिगवण गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वसलेले आहे. सोलापूरच्या दिशेला १५० किमी अंतरावर तर पुण्यापासुन १०० किमी आहे. भिगवण हे पुणे- सोलापूर महामार्गावरील प्रमुख व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. भिगवण हे मुळात पुनर्वसित गाव आहे. उजनी धरणाचा पाणीफुगवता गावालगत आहे. तर तसे पाहायला गेले तर उजनी धरण पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत भिगवण या गावाचा जुना आराखडा व त्याची भौगोलिक रचना अजूनही स्पष्ट रूपात जुने गाव किंवा जुने भैरवनाथाचे मंदिर या ठिकाणी दिसत आहे. भैरवनाथाचे मंदिर हे या गावाचे वैशिष्ट्य व ओळख आहे. कारण नाथबाबाची यात्रा ही या गावाची ओळख आहे तर ती दर वर्षी अष्टमी यात्रा म्हणून साजरी केली जाते.
भिगवणस्टेशन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.