प्रा. डाॅ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी (१० जुलै, १९४४:औरंगाबाद, महाराष्ट्र - ) हे एक वैचारिक लेखन करणारे मराठी लेखक आहेत. ते विद्यापीठातून बी.ए.(मराठी)ला दुसरे (१९६४), एम.ए.(संपूर्ण मराठी)ला (१९६६) पहिले आले होते. पीएच.डी.साठी त्यांनी
Modern Marathi Literature based on Mahabharata ह्या विषयावर प्रबंध लिहिला होता (१९७९)
शिक्षणादरम्यान गिरिधारींना मिळालेल्या शिष्यवृत्त्या : (१) महाराष्ट्र सरकारची दक्षिणा शिष्यवृत्ती (१९६५), (२) विद्यापीठाची मेरिट स्काॅलरशिप (१९६६). त्यांना वा.ल. कुलकर्णी, म.गो. देशमुख, यू.म.पठाण, एम.जी. पाटील, गो.के. भट, सुधीर रसाळ यांसारख्या प्राध्यापकांकडून शिकायला मिळाले.
पीएच.डी. झाल्यावर भास्कर गिरिधारी शिक्षक झाले. ते नाशिक, जव्हार येथे, आणि अन्य ठिकाणी ४० वर्षे मराठीचे प्राध्यापक, मराठी विभागप्रमुख किंवा प्राचार्य होते. काॅलेज विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अध्यापनासाठी त्यांना महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांची आणि महाराष्ट्राबाहेरच्या काही विद्यापीठांची मान्यता आहे, त्यांच्या हाताखाली २२हून अधिक विद्यार्थी पीएच.डी. आणि ११हून अधिक एम.फिल. झाले.
भास्कर गिरिधारी
यामागील विज्ञान आणि इतिहास.