भारतीय क्रिकेट संघाने १ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २००१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.
ह्या दौऱ्यावर ३-कसोटी सामन्यांच्या मालिका तसेच यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि केन्या दरम्यान त्रिकोणी मालिका खेळविली गेली.
कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. तर त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.
१६ ते २० नोव्हेंबर २००१ दरम्यान सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ येथील कसोटीमध्ये सामनाधिकारी, माजी इंग्लिश खेळाडू माईक डेनेसने वादग्रस्त निर्णय देत भारताच्या सहा खेळाडूंना विविध गुन्ह्यांखाली दोषी ठरवले. डेनेसच्या ह्या निर्णयाचा भारतीय संघाने तीव्र निषेध केला. ह्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा करून तिसरी कसोटी अनधिकृत ठरवली आणि सेहवागवरील एका सामन्याची बंदी कायम ठेवली.
माईक डेनेसने कारवाई केलेले खेळाडू खालीलप्रमाणे
सचिन तेंडूलकर: चेंडू कुरतडल्यामुळे एका कसोटीची बंदी
विरेंद्र सेहवाग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
सौरव गांगुली: संघाच्या वर्तणूकीवर अंकूश न ठेवता आल्याने एक कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी
हरभजन सिंग: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
शिवसुंदर दास: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
दीप दासगुप्ता: जास्त अपील केल्यामुळे एका कसोटीची बंदी
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००१-०२
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!