भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५

भारतीय क्रिकेट संघाने जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यावर पाच कसोटी खेळवले गेले. ही मालिका २०२५-२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. ऑगस्ट २०२४ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला आता अँडरसन–तेंडुलकर चषक म्हणून ओळखले जाते. मालिकेचे नाव सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन ह्या क्रिकेट विश्वातील दोन दिग्गजांच्या सन्मानार्थ बदलण्यात आले आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांनी गुरुवारी संयुक्तपणे ही नवीन ओळख जाहीर केली. ११ जून रोजी लॉर्ड्स येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी तेंडुलकर आणि अँडरसन यांनी ट्रॉफीचे अधिकृतपणे अनावरण केले.

यापूर्वी, भारत-इंग्लंड मालिका यजमान देशानुसार वेगवेगळ्या चषकासाठी खेळली जात होती. इंग्लंडमध्ये, ती पतौडी ट्रॉफी होती, ज्याचे नाव भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावावर होते. भारतात, ती अँथनी डि मेलो चषक होती, जी भारतीय क्रिकेट प्रशासनाच्या सुरुवातीच्या शिल्पकारांपैकी एकाच्या नावावर होती.

सचिन तेंडुलकरने बीसीसीआय आणि ईसीबीच्या पाठिंब्याने सुरू केलेला, पतौडी मेडल ऑफ एक्सलन्स हा कसोटी मालिकेतील विजेत्या कर्णधारासाठी नव्याने सादर केलेला पुरस्कार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →