इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविले गेले. जून २०२४ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. २०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून एकदिवसीय मालिका खेळविली गेली.
प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी तसेच त्याआधीच्या वचनबद्धता आणि जबाबदाऱ्यांबद्दल कोलकाता पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) ला केलेल्या विनंतीमुळे १३ ऑगस्ट २०२४ रोजी, बीसीसीआयने पहिल्या आणि दुसऱ्या टी२० Archived 2025-05-17 at the वेबॅक मशीन. सामन्याचे ठिकाण बदलले.
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४-२५
यामागील विज्ञान आणि इतिहास.