भारती कृष्ण तीर्थ कृत गणित लेखन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारती कृष्ण तीर्थ (१८८४ ते १९६०) जगन्नाथपुरी पीठाचे शंकराचार्य होते. इतर विषयांसोबत त्यांनी गणित या विषयातही एम.ए. केले होते. त्यांनी काही रोचक युक्त्यांवर आधारलेले हे अंकगणित विषयक लेखन अथर्व वेदाचा आधार असल्याचे सांगत, वैदिक गणित नावाने प्रस्तुत केले गेले. आणि लेखकाच्या मरणोपरान्त ते त्याच नावाने प्रकाशित आणि प्रचलित झाले.

प्रा. एस. जी. दाणी यांच्या साधार मतांनुसार भारती कृष्ण तीर्थ कृत यांतील गुणाकार-भागाकाराच्या गणित विषयक युक्त्या रोचक असल्या तरीही प्रत्यक्षात वेदांवर अथवा प्राचीन भारतीय गणितावर नव्हे तर सामान्य अंक-बीजगणितावर आधारलेल्या आहेत.

वैदिक गणित हे वेदांतून मांडले गेले आहे असा अपप्रचार काहीजण करतात, पण वस्तुस्थिती तशी नाही. हे वैदिक तर नाहीच पण गणितही नाही, असे बहुतेक गणितज्ञांचे मत आहे. असे असले तरी काही शाळांत मुलांना हे तथाकथित 'वैदिक गणित' शिकवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →