भारताचे महान्यायवादी (ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया) हे भारत सरकारचे कायदेशीर सल्लागार व सर्वश्रेष्ठ सरकारी वकील आहे. भारतीय संविधानात महान्यावादीची तरतूद करण्यात आली असून संविधानाच्या ७६ व्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती त्याची नेमणूक करतात. भारतीय नागरिकत्व आणि सर्वोच्य न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेली व्यक्तीच या पदासाठी पात्र समजली जाते. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच अशा व्यक्तीस या अधिकारपदावर राहता येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारताचे महान्यायवादी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.