भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.
भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.
इ.स. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.
भारतरत्न
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.