भद्राद्री कोठगुडम जिल्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भद्राद्री कोठगुडम जिल्हा

भद्राद्री कोठगुडम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली खम्मम जिल्ह्याचे विभाजन करून ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. भद्राद्री कोठगुडम जिल्हा तेलगंणाच्या पूर्व भागात आंध्र प्रदेश व छत्तीसगढ राज्यांच्या सीमेजवळ स्थित आहे. गोदावरी ही भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी आहे.

२०११ साली भद्राद्री कोठगुडम जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १०.६९ लाख इतकी होती. क्षेत्रफळाच्या दृष्टीने, भद्राद्री कोठगुडम हा तेलंगणा राज्यातील ७,४८३ किमी २ (२,८८९ चौरस मैल) क्षेत्रफळ असलेला सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला आणि ईशान्येला छत्तीसगढ राज्यातील बीजापुर आणि सुकमा जिल्हा, पूर्वेला पूर्व गोदावरी जिल्हा, दक्षिणेला खम्मम जिल्हा आणि पश्चिम गोदावरी जिल्हा, पश्चिमेला महबूबाबाद जिल्हा आणि वायव्येला मुलुगु जिल्हा आहे.

जिल्हा जिल्ह्यात २३ मंडळे आणि कोथागुडेम आणि भद्राचलम या दोन महसूल विभागांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग ३० हा येथील प्रमुख महामार्ग आहे. भद्राचलम हे एक पवित्र हिंदू स्थान ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →