भगवानबाबा ही राजयोगी महंत श्री संत भगवानबाबा यांच्या चरित्रावर आधारीत साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून प्रक्षेपित केली जाणारी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. तिचे प्रक्षेपण दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ पासून चालू केले जाणार आहे. या मालिकेचे पहिल्या २० भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून डॉ.विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत काम करत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक असून पुणे येथील द टायगर फिल्म्स अँड एन्टरटेनमेंटतर्फे रमेश स्स्ते यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेमुळे संत भगवानबाबा यांचे आध्यात्मिक व सामाजिक जीवन प्रथमच छोट्या पडद्यावर येणार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भगवानबाबा (मालिका)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!