भगवंतराव मंडलोई

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भगवंतराव अण्णाभाऊ मंडलोई (१५ डिसेंबर १८९२ - ३ नोव्हेंबर १९७७) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म खांडव्यात झाला. १९७० मध्ये ते पद्मभूषण या नागरी सन्मानाचे मानकरी होते.

ते दोनदा राज्याचे मुख्यमंत्री होते; १ जानेवारी १९५७ ते ३० जानेवारी १९५७ या अल्प काळासाठी आणि नंतर परत १२ मार्च १९६२ ते २९ सप्टेंबर १९६३ पर्यंत. १९५७ ची निवडणूक जिंकून त्यांनी अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेच्या खंडवा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →