ब्लिट्झक्रीग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ब्लिट्झक्रीग

ब्लिट्झक्रीग (जर्मन:Blitzkrieg, विद्युतवेगी युद्ध) हा एक युद्धव्यूह आहे. यात चिलखती सैन्य अग्रभागावर असून शत्रूच्या बचावात्मक फळीवर झंजावाती वेगाने संपूर्ण बळानिशी हल्ला केला जातो. शत्रूला चकित करीत आणि थोडे थोडे अंतर पार करीत ही फळी पुढे सरकत राहते. यावेळी चिलखती सैन्याला वायुसेनेची सतत कुमक असते.

ब्लिट्झक्रीग शत्रूला सावरायचा वेळ न देता थेट त्याच्या मुलुखात शिरून तेथे पुढील व्यूह व्हेर्निख्टुंगश्लाख्ट (विनाशी युद्ध) खेळला जातो आणि शत्रूला नेस्तनाबूद करण्यात येते.

हा व्यूह नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापरला. पश्चिम आघाडीवर बेल्जियम, नेदरलँड्स आणि फ्रांसवर हल्ला करून मोठे प्रदेश गिळंकृत करण्यात हा व्यूह वापरला गेला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →