बोर्दू

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बोर्दू

बोर्दू (फ्रेंच: Bordeaux; बास्क: Bordele) हे फ्रान्स देशामधील एक प्रमुख शहर आहे. फ्रान्सच्या नैऋत्य भागात गारोन नदीच्या काठावर व अटलांटिक महासागराजवळ वसलेले बोर्दू अ‍ॅकितेन प्रदेशाच्या तसेच जिरोंद विभागाच्या राजधानीचे शहर आहे. २०१० साली सुमारे २.३९ लाख लोकसंख्या असलेले बोर्दू फ्रान्समधील नवव्या क्रमांकाचे शहर व पाचव्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

बोर्दूची अर्थव्यवस्था बव्हंशी वाईन निर्मिती उद्योगावर अवलंबुन आहे. येथे आठव्या शतकापासून वाईन बनवण्यात आलेली आहे व जगातील सर्वांत मोठ्या वाईन उत्पादकांमध्ये बोर्दूची गणना होते. येथील १८व्या शतकतील अद्वितीय वास्तूरचनेसाठी बोर्दूला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →