बैरूत (अरबी: بيروت; हिब्रू: ביירות; लॅटिन: Berytus; फ्रेंच: Beyrouth; तुर्की: Beyrut; आर्मेनियन: Պէյրութ) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बैरूत शहर लेबेनॉनच्या पश्चिम भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
इ.स. पूर्व पंधराव्या शतकामधील उल्लेख सापडलेले बैरूत जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. सध्या बैरूत लेबेनॉनचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असून २०१२ साली बैरूतची लोकसंख्या ३.६१ लाख तर महानगराची लोकसंख्या २० लाकांहून अधिक होती. बैरूत हे लेबेनॉनमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असून येथील सौम्य हवामान व समुद्रकिनारे अनुभवायला येथे अनेक पर्यटक येतात. परंतु वारंवार होत असणाऱ्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे बैरूतची अर्थव्यवस्था काहीशी कमकूवत बनली आहे.
बैरूत
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.