बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.
३०,५२८ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या बेल्जियमची लोकसंख्या सुमारे १.१ कोटी आहे. बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत व ह्या प्रदेशांना बव्हंशी स्वायत्तता आहे. उत्तरेकडील फ्लांडर्स हा डच भाषिक तर दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेश आहे. राजधानीचे शहर ब्रसेल्स भौगोलिक दृष्ट्या जरी फ्लांडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो.
मध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे. १८३० साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला. १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाट्याने विकास झाला. विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशांप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे.
बेल्जियम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.