बेलासिस मार्ग हा ताडदेव गोल ते मुंबई सेंट्रल, नागपाडा चौक पर्यंत आहे. हल्ली हा जहांगीर बोमन बेहराम रस्ता म्हणून ओळखला जातो.
हा रस्ता १३१ वर्षे जुना आहे आणि मुंबईतील मुंबई सेंट्रल ह्या रेल्वे स्थानकावरून जातो. हा रस्ता ब्रिटिश सरकारने सन १८९३ मध्ये बांधला. हा रस्ता बांधण्यासाठी ब्रिटिश सरकारने सुरतमधील दुष्काळग्रस्त मजूरांची मदत घेतली. ब्रिटिश मेजर जनरल जॉन बेलासिस ह्यांचे नाव ह्या रस्त्याला देण्यात आले आहे. हल्ली ते नाव बदलून रस्त्याला जहांगीर बोमन बेहराम ह्यांचे नाव देण्यात आले आहे.
ह्या रस्त्याच्या उजव्या बाजूला पारशी लोकांची सोनावाला एस्टेट आहे. डाव्या बाजूला शापूर आणि जहांगीर भावनगरी ह्यांचे डायना टॉकीज आहे. बेलासिस रस्त्यावरून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी जिना बांधलेला आहे. बेलासिस रस्त्यावर २५-३० घोड्याचे तबेले होते.एका तबेल्यात ७०-८० घोडे ठेवले जात. येथील परिसरात घोडा गाडीसाठी लागणारे कंदील, दिवे, खोगीर, लगाम, गळ्यात घालावयाच्या घुंगराच्या माळा, रिकिब, चाबूक विकणाऱ्या माणसांची दुकाने होती. बाजूला असलेल्या एका मोक्याच्या ठिकाणी सन १९३० साली मिनर्व्हा थिएटर बांधले होते. त्याची सातशे आसनांची क्षमता होती. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारने इथे असलेल्या त्यांच्या मालकीचा भूखंड मराठा मंदिर संस्थेला दिला. सन १९५६ साली गोलचा ह्यांनी येथे मराठा मंदिर हे थिएटर बांधले. मराठा मंदिर चे उद्घाटन समकालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांनी बी. आर. चोप्रा ह्यांच्या साधना चित्रपटाच्या प्रिमिअरने केले होते. सन १९०९ मध्ये येथे अलेक्झांड्रा थिएटर बांधले होते. अब्दुल अली युसूफ अली आणि अर्देशीर ईराणी हे त्या थिएटरचे मालक होते.
बेलासिस मार्ग
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.