चर्नी रोड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चर्नी रोड

चर्नी रोड तथा राजा राममोहन रॉय मार्ग हा मुंबईतील एक प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता गिरगाव चर्चपाशी सुरू होतो आणि वल्लभभाई पटेल रोडला मिळाल्यावर संपतो. याच रस्त्यावर राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजाचे सभागृह आहे.

या रस्त्याजवळच चर्नी रोड नावाचे मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानकही आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) या स्थानकाला गिरगाव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८ च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले. मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब. पु.बा.जोशी म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठ्या संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →