गिरगाव

या विषयावर तज्ञ बना.

गिरगाव

गिरगाव दक्षिण मुंबईतील एक भाग आहे. पश्चिम रेल्वे वरील चर्नी रोड हे रेल्वे स्थानक गिरगावाचा भाग आहे. येथील चाळसंस्कृती किंवा चाळीतील जीवनावर बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिले आहे.

येथील गिरगाव चौपाटी प्रसिद्ध आहे. गिरगावात खाडिलकर मार्ग आहे. पत्रकार, नाटककार आणि सुधारणावादी असलेले आणि प्रसिद्ध कवी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे सुपुत्र असलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ह्यांचे नाव ह्या रस्त्याला देण्यात आले आहे.गिरगावात असलेल्या गावदेवी परिसरात एका रस्त्याला डॉ.काशीबाई नवरंगे मार्ग असे नाव दिलेले आहे.

गिरगावात अवंतिकाबाई गोखले मार्ग,जगन्नाथ शंकरशेट मार्ग, विठ्ठलभाई पटेल मार्ग आहेत.अवंतिकाबाई गोखले ह्यांचे घर अवंतिकाबाई गोखले मार्गावर होते.

चर्नी रोड रेल्वे स्थानक ते कुपरेज फुटबॉल मैदान हा रस्ता सन १८५० मध्ये झाला तेव्हा त्याचे नाव क्वीन्स रोड असे ठेवले होते.भारतरत्न महर्षी धोंडो कर्वे ह्यांनी स्थापन केलेले नाथीबाई दामोदर ठाकरसी हे पहिले महिला विद्यापीठ (स्थापना १९१६) क्वीन्स रोडवर असल्याने महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृती निमित्ताने सन १९५८ मध्ये क्वीन्स रोडचे नाव महर्षी कर्वे मार्ग असे केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →