बेलम लेणी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बेलम लेणी

बेलम लेणी भारतीय उपखंडातील सर्वात मोठी आणि प्रदीर्घ तसेच सर्वांसाठी खुली लेणी प्रणाली आहे. अशा अधोमुखी लवणस्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ चुनखडीची कमान असलेली. बेलम लेणी ही लांब, प्रशस्त, ताजे पाणी आणि वक्राकार आकार यामुळे प्रसिद्ध आहेत. या नैसर्गिक भूमिगत लेणी प्रणालीमध्ये भूमीगत पाण्याचा झरा असून तो तेथेच भूमिगत होतो.

४६ मी (१५१ फूट) पाताळगंगा.तेलगू भाषेतत्यास बेलम गुहलु असे म्हणतात. बेलम लेणीसमूहाची एकूण लांबी ३,२२९ मी (१०,५९३.८ फूट)असून ती भारतातील उपखंडातील केरम लायट प्राह(Krem Liat Prah) या मेघालय येथील लेण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नैसर्गिक लेणी आहेत. मेघालयातील लेण्यांनंतर भारतीय उपखंडातील हे एक मध्यवर्ती राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे.

बेलम लेण्यांकडे वैज्ञानिकांचे लक्ष इ.स. १८८४ मध्ये वेधले गेले.. इ.स. १९८२ ते १९८४ मध्ये जर्मन गुहा विशेषज्ञांचा एक संघ एच. डॅनियल जय बायर यांच्या नेतृत्वाखाली आला होता. त्याचप्रमाणे ब्रिटिश सर्व्हेयर रॉबर्ट ब्रुस गॅंरी ब्लेक यांनी या लेण्याचा तपशीलवार शोध लावला. त्यानंतर इ.स. १९८८ मध्ये राज्य शासनाने हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. आणि आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळ (आंध्रप्रदेश पर्यटन विभाग महामंडळ (APTDC)) यांनीही विकास करून ही लेणी पर्यटकांचे आकर्षण म्हणून बनवली आहे. ३.५ किमी (२.२ मैल) १.५ किमी (०.९ मैल)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →