शिरवळ लेणी १५ बौद्ध लेणींपैकी एक असून ती पुणे पासून ४८ किलोमीटर अंतरावर, शिरवळ नावाच्या लहान खेड्यात आहे.
यात एक चैत्य आहे आणि १४ लेणी विहार दर्शवतात. सर्व लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळाशी सापेक्ष आहेत.
शिरवळ लेणी किंवा पांडवदरा लेणी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथून जवळच पांडवदरा नावाची दुर्लक्षित बौद्ध लेणी आहेत.याच परिसरात पुणे-बंगळूर महामार्गानजीक शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावाच्या दक्षिणेस सुमारे दोन किलो मीटर अंतरावर असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत पांडवदरा शिवारात पुरातन लेणी आहे. पूर्वीच्या काळी पांडव अज्ञातवासात असताना या डोंगर रांगेतील काळा पाषाण खोदून अनेक गुहा तयार करून त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता, आशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावरून या लेण्यांना पांडव लेणी असे म्हणले जाते. वास्तविक ही बौद्ध लेणी आहेत.
शिरवळ लेणी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?