बेगम कुदसिया ऐजाज रसूल (२ एप्रिल, १९०९ - १ ऑगस्ट, २००१) या भारताच्या संविधान सभेतील सदस्य आणि राजकारणी होत्या. त्या एकमेव मुस्लिम महिला सदस्य होत्या. त्यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात भूमिका पार पाडली होती.
१९६९ ते १९७१ या काळात त्या समाजकल्याण आणि अल्पसंख्याक मंत्री होत्या. भारत सरकारने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना २००० साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
बेगम ऐजाज रसूल
थोडक्यात पण महत्त्वाचे.