बीड

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बीड

हा लेख बीड शहराविषयी आहे. बीड जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार तसेच कलाकरांचा बाल्ले किल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते.जिल्ह्याची उत्तर व दक्षिण सीमा गोदावरी व मांजरा नदी ने बंदीस्थ आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ऊस उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्याच्या मधोमध पूर्व पश्चिम बालाघाट डोंगररांग आढळते. बालाघाट डोंगररांगे मुळे जलविभाजन होऊन उत्तर व दक्षिण वाहिन्या नद्यांचाचा उगम होतो.

जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेली आहे. शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट यांचा संबंध बीड जिल्ह्यासी आहे. रामायणात लंकाधीश रावण व जटायू (रामायण) चं युद्ध याच भूमीत झालं. बीड शहरातील पेठबीड भागात जटायू मंदिर आज ही अस्तित्वात आहे. पेशवाईच्या काळी पानिपत येथे मराठी सेनेचा पराभव झाला. काही काळ मराठा सत्तेत नैराश्य आले. परंतु त्याच काली जिल्ह्यातील राक्षस भुवन येथे निजामशाहीला पराभूत करून पुन्हा एकदा मराठी सत्तेला गतवैभव प्राप्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →