बिलाल ताहिर (जन्म ३१ मे १९९८) हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेट खेळाडू आहे जो कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने ६ जुलै २०१९ रोजी कुवेतकडून कतार विरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले. जुलै २०१९ मध्ये, त्याला २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी कुवेतच्या संघात स्थान देण्यात आले. तो २२ जुलै २०१९ रोजी मलेशिया विरुद्ध प्रादेशिक अंतिम फेरीच्या कुवेतच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळला. ऑक्टोबर २०२१ मध्ये, २०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेत अ गटातील सामन्यांसाठी कुवेतच्या संघात त्याची निवड करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिलाल ताहिर
थोडक्यात पण महत्त्वाचे.