बास्तीय (मराठी लेखनभेद: बॅस्तीय ; चुकीचा रूढ नामभेद: बॅस्टिल; (फ्रेंच: Bastille) हा पॅरिस शहरामधील एक ऐतिहासिक किल्ला होता. इ.स.च्या १४व्या शतकात शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान बांधल्या गेलेल्या या किल्ल्याचा वापर फ्रेंच सम्राटांनीं मुख्यत: एक तुरुंग म्हणून केला. १४ जुलै, इ.स. १७८९ रोजी सुमारे १००० विरोधकांनी याच्यावर चढाई केली व ह्यातच फ्रेंच राज्यक्रांती मुळे रोवली गेली. त्याच वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस सरकारी आदेशांवरून हा किल्ला पाडून टाकण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बास्तीय
थोडक्यात पण महत्त्वाचे.