आयफेल टॉवर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आयफेल टॉवर

आयफेल टॉवर (फ्रेंच: Tour Eiffel) ही १८८९ साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर ही फ्रान्सची सर्वाधिक ओळखली जाणारी खूण मानली जाते.

आयफेल टॉवर ३२४ मीटर (१,०६३ फूट) उंच आहे व त्याला तीन मजले आहेत. गुस्ताव्ह आयफेल ह्या फ्रेंच वास्तूशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे ३०० कामगारांनी १८,०३८ अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला.

आयफेल टॉवर पॅरिसमधील सर्वांत उंच इमारत आहे व १८८९ ते १९३० ह्या काळादरम्यान जगातील सर्वांत उंच इमारत होती. आयफेल टॉवर हे जगातील सर्वांत लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →