बाळ धुरी (१९४४ - हयात) हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते आहेत. त्यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील चित्रपटात काम केले आहे. चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर या त्यांच्या पत्नी आहेत. मराठी चित्रपटांमधील त्यांच्या अनेक भूमिकांसाठी आणि रामानंद सागर यांच्या टीव्ही मालिका, रामायण मालिकेत त्यांनी दशरथ राजाची, तर त्यांच्या पत्नी जयश्रीने राणी कौसल्या यांची भूमिका केली होती. तेरे मेरे सपने १९९६ या चित्रपटात चंद्रचूड सिंग यांच्या सचिव म्हणून काम केले होते.
धुरी यांचे खरे नाव भैय्युजी असे होते. त्यांना चार भावंडे असून त्यानंतर हे घरातील सर्वात लहान असल्याने त्यांना बाळ असे संबोधले जात असे. शेवटी हेच टोपण नाव कायम झाले. धुरी यांनी मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातून वस्त्र अभियांत्रिकी (टेक्सटाइल इंजिनिअरिंग) शिक्षण घेतले होते. प्रारंभी त्यांनी नोकरी देखील केली होती. 'पिरामल' गिरणीत त्यांनी नोकरी सुरू केली. तेथे आंतरगिरणी स्पर्धेत त्यांनी मराठी नाटक ‘काचेचा चंद्र’ मध्ये काम केले. अभिनेत्री उषा नाडकर्णी या देखील त्यांच्यासोबत या नाटकात होत्या. सदरील स्पर्धेत त्यांच्या नाटकाचा पहिला क्रमांक तर आलाच, सोबत त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक देखील मिळाले. मराठी, हिंदी, गुजराती, मारवाडी अशा विविध भाषांतील सत्तर चित्रपटांतूनही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. याच सोबत तीस-पस्तीस नाटकां मध्ये त्यांनी काम केले असून एकूण नाटकांचे प्रयोग साडेपाच हजारांहून अधिक झाले आहेत. त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि काही टेलिफिल्ममध्ये देखील काम केले आहे.
१९७५ साली जयश्री गडकर सोबत त्यांचे लग्न झाले. गडकर या पूर्वीपासूनच मराठी चित्रपसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करत होत्या. त्यामुळे लग्नानंतर देखील त्यांनी जोडीने विविध चित्रपटात काम केले.
संगीत वरद या संगीत नाटकात ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना सहभागी करून घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
बाळ धुरी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.