बारामती विमानतळ हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथील छोटा विमानतळ आहे. हा विमानतळ बारामती शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. हा विमानतळ खाजगी विमाने आणि पायलट प्रशिक्षणासाठी वापरला जातो.
हा विमानतळ १९९६ मध्ये एमआयडीसीने बांधला.
१८२.५ हेक्टर (४५१ एकर) क्षेत्रफळाचा हा विमानतळ समुद्रसपाटीपासून ६०४ मीटर उंचीवर आहे. येथे एक धावपट्टी असून ती १,७७० मीटर लांब आणि ३० मीटर रुंद आहे. याची आखणी ११/२९ अशी आहे. धावपट्टीच्या दोन्ही टोकांना विमाने परतण्यासाठी जागा आहे. विमानतळावर ११२ चौरस मीटरचे छोटे टर्मिनल आहे. येथे येण्यासाठी पक्का रस्ता आहे.
बारामती विमानतळावर वाहतूक नियंत्रक मिनारा असला तरी तेथे नियंत्रक नसतात. शेजारील अकादमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या फ्लाइट स्कूलमधील वरिष्ठ वैमानिक १२९.२५ मेगाहर्ट्झ रेडियोवर आसपासच्या हवाई क्षेत्रातील वाहतुकीचे निरीक्षण करतात आणि तेथे उडणाऱ्या वैमानिकांना सूचना देतात.
बारामती विमानतळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.