बाभूळ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बाभूळ

बाभूळ (Acacia) हा उष्ण कटिबंधीय प्रदेशातला एक विशाल वाढणारा वृक्ष आहे. बाभळीचे लाकूड कठीण असते. बाभळीच्या खोडाला छेद केल्यास त्यातून डिंक स्रवतो. हा उत्तम प्रकारचा डिंक पाैष्टिक असल्याने त्याचा कूट करून त्यापासून बनवलेले लाडू बाळंतिणीला खायला घालतात. घरांना-शेतांना वेड्या बाभळीच्या काटेरी झुडपांचे कुंपण घालतात.

वेडी बाभळ हा बाभळीचा एक प्रकार आहे.या वनस्पतीची पाने शमीसारखे दिसतात. अमेरिकेतील काही उष्ण कटिबंधातील भागातून खूप वर्षांपूर्वी भारतात आली अन्‌ येथील मातीत रुजली. साध्या बाभळीपेक्षा ही अधिक गतीने वाढते.

बाभळीवी अन्य नावे : बब्बूळ, बब्बूल, बर्बुर (संस्कृत), कीकर, बाबुल (हिंदी), बावळ (गुजराती), शमीरूकु (कोंकणी), कुरूवेलम (मल्याळम), करूवेल (तेलुगू) वगैरे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →