खारफुटी हा एक समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे. खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. हिची मुळे समुद्राच्या पाण्यातले मिठाचे प्रमाण सहन करू शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात. खाऱ्या जमिनीतही जिची फूट होते ती खारफुटी.
मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती असेही म्हणतात. इंग्रजीत मॅंग्रोव्ह. तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे. या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात. भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्याची किनारपट्टीची लांबी ही सर्वात जास्त आहे. त्या किनारपट्टीवर भारतामधील खारफुटीचे दुसऱ्या क्रमांकाचे
जंगल आहे. जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण ७३ जाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये ४६ जाती आहेत. पश्चिम किनार पट्टीवर २७, तर पूर्व किनार पट्टीवर ४० जाती आहेत .अंदमान आणि निकोबार या बेटावर ३८ जाती आहेत.
खारफुटी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!