भारतातील जवळपास ३५% लोकसंख्या किनाऱ्यापासून १०० किमीच्या अंतरावर आहे. पाणथळ प्रदेश, नद्यांच्या खाडीजवळील परिसंस्था, खारफुटीची जंगले, दलदलीचा प्रदेश, प्रवाळ परिसंस्था ,समुद्री ग्रास बेड, वालुकामय आणि खडकाळ किनारे इ. ही सागरी व सागरी किनाऱ्यावरील परिसंस्थेची उदाहरणे आहेत.
भारतामध्ये बेटांसह ७५१७ कि.मी.ची सागरी किनारपट्टी आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केंद्र शासित प्रदेश (यूटी) दमण आणि दीव,पुडुचेरी ,अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे यांचा समावेश आहे. भारतीय मुख्यभूमी मध्ये एकूण ६६% किनारपट्टी जिल्हे आहेत.
खारफुटीच्या जंगलावर परिणाम करणारे घटक-
१. नदीपात्रावरील धरणांच्या बांधकामाने नदीपात्रातील प्रवाह कमी होणे,
२. सागरी प्रवाहावर बांधलेले अडथळे,
३. नैसर्गिक अधिवासावर मानवी हस्तक्षेप, उदाहरणार्थ शहरीकरण, कारखानदारी, सागरी मासेमारीसाठी होणारे अतिक्रमण
जागतिक हवामानबदलाने भारतीय सागरकिनारपट्टीवर होणारे परिणाम
या विषयावर तज्ञ बना.