बापूराव शिंगटे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

'डॉ. बापूराव बब्रुवान शिंगटे' हे रसायनशास्‍त्र विभाग Archived 2018-01-03 at the वेबॅक मशीन., डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक म्हणून २००८ पासून कार्यरत आहेत. त्यांचे जन्मगाव सलगरा दिवटी [ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद (महाराष्ट्र)] हे मागास भागातील असूनही त्‍यांनी डॉ.बा.आं.म.विद्यापीठाच्‍या रसायनशास्‍त्र विभागातून एम.एस्‍सी. पदवी विशेष प्राविण्‍यासह संपादन केली. त्‍यानंतर त्‍यांनी २००१ मध्ये सेट परीक्षेसोबतच यूजीसी-सीएसआयआर द्वारे घेतल्‍या जाणाऱ्या केमिकल सायन्सेसमध्ये नेट परीक्षा जेआरएफसह यश संपादन केले आहे. नेट परीक्षा जेआरफमध्‍ये उत्‍तीर्ण होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील पहिले विद्यार्थी होत. यानंतर त्‍यांनी राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल Archived 2012-03-30 at the वेबॅक मशीन.), पुणे येथे डॉ.बी.जी. हाजरा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टीरॉइड केमिस्ट्री’ या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादन केली (२०१०).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →