बापू बिरू वाटेगांवकर (१९२२: मु.पो.बोरगांव ता.वाळवा जि.सांगली मृत्यू:१६ जानेवारी, २०१८ ,आधार हास्पिटल इस्लामपूर). हे अन्यायाविरोधात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले होते. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. बोरगांवातील रंगा शिंदे हा गोर-गरिबांना त्रास देत असे. गावातील स्त्रियांची छेड काढत असे. बापू बिरू वाटेगावकरांनी त्याची हत्या केली. रंगाच्या भावानेही (आनंदा शिंदे) असाच उच्छाद मांडला, तेंव्हा बापू बिरु वाटेगावकरांनी त्याचीही हत्या केली.बापूंना अटक करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही ते पकडले न गेल्याने पोलिसांनी बापू बिरु वाटेगावकरांच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बापू वाटेगावकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.