सूरश्री केसरबाई केरकर (जुलै १३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १६, इ.स. १९७७) या हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रख्यात गायिका होत्या. हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत त्या गायन करत. इ.स.च्या २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते. नासाने 1977 मध्ये सोडलेल्या व्हायोजर-1 या उपग्रहामध्ये बसवलेल्या तपकडीमध्ये सुरश्री केसरबाई केरकर यांच्या आवाजातील 'जात कहा हो अकेली गोरी' हे गाणे रेकॉर्डिंग केलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केसरबाई केरकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!