बाजी पासलकर

या विषयावर तज्ञ बना.

बाजी पासलकर

बाजी पासलकर (देशमुख) (अज्ञात - २४ मे १६४९), हे बारा मावळपैकी एक असलेल्या मोसे खोऱ्यातील पिढीजात देशमुख होते, बाजी पासलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. स्वराज्याच्या कार्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे ते पहिलेच ठरले.

बाजी पासलकर हे मोसे खोऱ्यातील पिढीजात वतनदार. निगडे-मोसे गावापासून ते धामन-ओव्होळपर्यंतची ८४ गावांची देशमुखी त्यांना होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते, तंटे सोडविण्यात ते हुशार होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →