नदी डोंगरातून खाली उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो त्याला "मावळ" असे म्हणतात, असा स.आ.जोगळेकर ह्यांच्या "सह्याद्री" ह्या पुस्तकांत संदर्भ आहे.
अर्वाचीन मराठीत ह्याच भूरचनेला खोरे, दरा (=पर्वतामधले खोरे) किंवा दरी (=लहान दरा) म्हणतात.
सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली एकूण १२ मावळ आहेत.
काही ठिकाणी असेही वाचायला मिळते की शिवाजी राजांचे मावळे म्हणजे सैनिक हे पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळ प्रांत असे म्हणले जाई, पण त्याला भक्कम पुरावा नाही.
तसेच स्वराज्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश म्हणजेच सूर्याच्या मावळतीची दिशा म्हणून त्याला ‘मावळ’ म्हणतात, अशीही कथा सांगितली जाते. हेही बरोबर नाही.
हा मावळ प्रांत विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे १२ भाग करण्यात आले.
बारा मावळ प्रांताची नावे पुढीलप्रमाणे :
आंदर मावळ
कानद खोरे
कोरबारसे मावळ
गुंजन मावळ
नाणे मावळ
पवन मावळ
पौड खोरे
मुठा खोरे
मोसे खोरे
रोहिड खोरे
वळवंड खोरे
हिरडस मावळ
बारा मावळ
या विषयावर तज्ञ बना.