बांगलादेश रेल्वे ((बंगाली: বাংলাদেশ রেলওয়ে) ही बांगलादेश देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण ३,६०० किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली बांगलादेश रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. ब्रिटिश राजवटीदरम्यान १८६२ साली बंगाल आसाम रेल्वे ह्या नावाने स्थापन झालेली बांगलादेश रेल्वे आजच्या घडीला बांगलादेशातील सर्वाधिक वापरली जाणारी वाहतूक यंत्रणा आहे. बांगलादेश रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते व राजधानी ढाकाला देशातील इतर प्रमुख शहरांसोबत जोडते. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बांगलादेश रेल्वे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.