पाकिस्तान रेल्वे (उर्दू: پاکستان ریلویز ) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण ७,७९१ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली पाकिस्तान रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. आजच्या घडीला पाकिस्तानमधील एकूण वाहतूकीपैकी केवळ ४ टक्के वाहतूक पाकिस्तान रेल्वेद्वारे करण्यात येते. २०१८-१९ साली सुमारे ७ कोटी प्रवाशांनी पाकिस्तान रेल्वेमधून प्रवास केला.
प्रमुख्याने ब्रॉड गेजवर धावणाऱ्या पाकिस्तान रेल्वेचे ५ प्रमुख मार्ग असून दक्षिणेकडील कराचीला लाहोर व रावळपिंडीमार्गे पेशावरसोबत जोडणारा मार्ग देशातील सर्वाधिक वर्दळीचा रेल्वेमार्ग आहे. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.
पाकिस्तान रेल्वे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.