डॉ. बसंती बिश्त या उत्तराखंडच्या प्रसिद्ध लोकगायिका आहेत. त्यांचा जन्म १९५३ साली झाला. उत्तराखंडच्या जागर लोक-प्रकाराच्या पहिल्या महिला गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. गायनाचा जागर प्रकार हा देवतांना आवाहन करण्याचा एक मार्ग आहे. परंपरागत याचे गायन पुरुषांद्वारे केले जाते. परंतु बसंती बिष्ट यांनी ही प्रथा मोडली. आणि आज त्या एक सुप्रसिद्ध आवाज आहेत. गायनाचा हा पारंपरिक प्रकार जपण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. बसंती बिश्त यांना २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बसंती बिश्त
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.