बसंती देवी (२३ मार्च, इ.स. १८८० - इ.स. १९७४) भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केले गेले.
बसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत आसाम राज्याचे दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, कोलकाता येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला. १८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली. वसंतीदेवी मधी ह्या 1922 चितगाव मध्ये भरलेल्या प्रांतिक कॉँग्रेस च्या अध्यक्षा होत्या.
बसंती देवी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.