बशीरहाट हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बशीरहाट परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ उत्तर २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. २०२४ साली तत्कालीन खासदार हाजी नुरुल इस्लाम ह्याचे निधन झाल्यानंतर सध्या ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोणताही खासदार करीत नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बशीरहाट लोकसभा मतदारसंघ
या विषयावर तज्ञ बना.