बर्मिंगहॅम (इंग्लिश: Birmingham) हे अमेरिका देशाच्या अलाबामा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या बर्मिंगहॅम शहराची लोकसंख्या २.१२ लाख इतकी आहे.
इ.स. १८७१ साली स्थापन झालेल्या ह्या शहराचे नाव इंग्लंडमधील बर्मिंगहॅम ह्या शहरावरून देण्यात आले आहे. बर्मिंगहॅम हे अमेरिकेच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे बँकिंग व व्यापार केंद्र आहे.
बर्मिंगहॅम (अलाबामा)
या विषयातील रहस्ये उलगडा.