एडविन यूजीन बझ आल्ड्रिन जुनियर (२० जानेवारी, १९३०: २०, १९३०) हे एक अमेरिकन अंतराळयात्री, वैमानिक अभियंता आणि लढाऊ पायलट आहेत. त्यांनी १९६६ च्या जेमिनी १२ मोहिमेचे पायलट म्हणून तीन वेळा अंतराळयानाबाहेर भ्रमण केले होते. १९६९ च्या अपोलो ११ मोहिमेत ते मुख्य यानापासून चंद्रावर उतरणाऱ्या आणि परत येणाऱ्या लुनर मॉड्यूल ईगल या वाहनातचे चालक होते. मिशन कमांडर नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर चंद्रावर पाउल ठेवणारे ते दुसरे व्यक्ती होते. आल्ड्रिन हे अपोलो ११ मधून प्रवास करणाऱ्या चमूपैकी एकमेव जिवंत व्यकी आहेत. २०२५ मध्ये जिम लोवेल यांच्या मृत्यूनंतर आल्ड्रिन हे सर्वात वयस्कर जिवंत अंतराळवीर झाले.
आल्ड्रिन यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अंतराळविज्ञानात डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवली. त्यानंतर त्यांची मिळवल्यानंतर, अल्ड्रिन यांची नासाच्या अंतराळवीर गट ३मध्ये निवड झाली. डॉक्टरेट पदवी असलेले आल्ड्रिन पहिले अंतराळवीर होते.
त्यांचे पहिले अंतराळ उड्डाण १९६६ मध्ये जेमिनी १२ यानातून झाले होते. /e दरम्यान त्यांनी पाच तासांपेक्षा जास्त वेळ अंतराळयानाबाहेर भ्रमण केले. तीन वर्षांनंतर अपोलो ११ मोहमेंतर्गत आल्ड्रिनने २१ जुलै, १९६९ रोजी ०३:१५:१६ ( UTC ) चंद्रावर पाऊल ठेवले. आर्मस्ट्राँगच्या नंतर १९ मिनिटांनी हे चंद्रावतरण होते. प्रेस्बिटेरियन धर्मगुरू असलेल्या आल्ड्रिनने चंद्रावर कम्युनियन घेतले. हा चंद्रावरील पहिला धार्मिक समारंभ होय. तसेच आल्ड्रिन हे चंद्रावर खाणारे आणि पिणारे पहिले व्यक्ती झाले.ृ
बझ आल्ड्रिन
या विषयावर तज्ञ बना.