बंड गार्डन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बंड गार्डन पुणे रेल्वे स्थानकापासून २ किमी स्थित आहे. ही बाग फिट्झगेराल्ड ब्रिजच्या शेजारी वसलेली आहे आणि मुळा नदीवरील बांध किंवा धरणावरून त्यांचे नाव घेतले आहे.

बंडगार्डन पूल हा पुण्यातील मुळा-मुठा नदीवर बांधलेला एक पूल आहे. याचे जुने नाव फिट्झगेराल्ड पूल असे आहे. भारतातील ब्रिटिश राजवटीत इ.स. १८६७ साली हा पूल बांधला. हा दगडी आणि रुंद कमानी असलेला पुण्यातील पहिला पूल होता. या पुलाचे बांधकाम कॅप्टन रॉबर्ट एस. सेलन या अभियंत्याने केले होते. पुलाला मुंबईचे १८६७ ते १८७२ च्या दरम्यान गव्हर्नर असलेले विल्यम रॉबर्ट व्हेसी फिट्झगेराल्ड यांचे नाव देण्यात आले होते. बांधकामाला त्या वेळी दोन लाख रुपये खर्च आला होता.

पुलावर सिंहाच्या दोन दगडी प्रतिमा आहेत. पूल जुना झाल्यानंतर त्याचा वापर कमी व्हावा म्हणून २०१३ साली त्याला समांतर असा एक पूल बांधण्यात आला, त्या पुलाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. आता या पुलावर पाश्‍चात्य देशांच्या धर्तीवर खुले कलादालन (आर्ट प्लाझा) साकारणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →