"बॅंग-बॅंग क्लब" हे एका दक्षिण आफ्रिकेतील छायाचित्रकारांच्या गटाचे अनौपचारिक नाव होते. हा गट इ.स.१९९० ते १९९४ च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत होता. या कालखंडात दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदी धोरणे संपुष्टात आणून कृष्णवर्णीयांना समान मताधिकार मिळवून देण्यासाठीच्या चर्चा सुरू होत्या, . या चळवळीचे समर्थक असलेल्या इंकाथा मुक्ती दल (Inkatha Freedom Party) व आफ्रिकी राष्ट्रीय कॉग्रेस (African National Congress Archived 2015-08-14 at the वेबॅक मशीन.) या दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधीपासूनच सशस्त्र चकमकी घडायला सुरुवात झाली होती . बॅंग-बॅंग क्लबच्या सदस्यांनी याच काळात (इ.स.१९९० ते १९९४) दक्षिण आफ्रिकेतील विविध उपनगरांमधून वृत्तांकणाची व छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली.
या गटामध्ये मुख्यत: "केविन कार्टर", "ग्रेग मारिनोविच", "केन ऊस्टरब्रोएक" आणि "होआव सिल्वा" या चार छायाचित्रकार व पत्रकारांचा समवेश केला जातो, तथापि, आणखीही काही पत्रकारांनी तसेच छायाचित्रकारांनी बॅंग-बॅंग क्लब सोबत काम केलेले आहे (ऊदाहणार्थ: जेम्स नाख्टवे आणि गॅरी बर्नार्ड). . बॅंग-बॅंग क्लबच्या कारकिर्दीवर आधारित असलेला याच नावाचा इंग्रजी चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता, स्टीव्हन सिल्व्हर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. .
बँग-बँग क्लब
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!