एमी टॅन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एमी रुथ टॅन (जन्म: १९ फेब्रुवारी १९५२) एक अमेरिकन लेखक आहेत. दि जॉय लक क्लब या कादंबरीसह इतर अनेक कादंबऱ्या, लघुकथा संग्रह आणि बालसाहित्यासाठी त्या ओळखल्या जातात. ‘द जॉय लक क्लब’ या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा एक चित्रपटदेखील बनवला गेला आहे.



टॅन यांनी इतरही अनेक कादंबऱ्या लिहिल्या. दि किचन गॉड्स वाईफ, दि हंड्रेड सिक्रेट सेन्सेस, दि बोनसेटर्स डॉटर, सेव्हिंग फिश फ्रॉम ड्राउनिंग आणि दि व्हॅली अमेझमेंट यांचा त्यात समावेश होतो. टॅनचे नवीनतम पुस्तक हे एक स्मरणपत्र आहे. त्याचे शीर्षक आहे, व्हेअर दि पास्ट बिगिन्स: अ रायटर्स मेमवा (2017). या व्यतिरिक्त, टॅन यांनी लहान मुलांची दोन पुस्तके लिहिली आहेत - दि मून लेडी (1992) आणि सागवा : दि चायनीज सयामीज कॅट (1994). यावर आधारित अ‍ॅनिमेटेड मालिका पीबीएसवर प्रसारित करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →