फ्रेंड्स ही एक अमेरिकेतील दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका आहे. डेव्हीड् क्रेन् आणि मार्टा कॉफमन् हे या मालिकेचे निर्माते आहेत. ही मालिका सर्वप्रथम सप्टेंबर २२, १९९४ वर्षी नॅशनल ब्रॉडकास्टिंग चॅनल वाहिनीवर झळकली. न्यू यॉर्क शहरातील मधील मॅनहॅटन भागामध्ये एकत्र राहणारे मित्र आणि एकत्रित राहणीमानाशी निगडीत खर्चांसंबंधांतील त्यांच्या तडजोडी यावर ही मालिका आधारित आहे. ब्राईट / काउफमन / क्रेन निर्मितिसंस्थेने वॉर्नर ब्रदर्स कंपनीबरोबर ही मालिका सहनिर्मित केली. प्रारंभी क्रेन, काउफमन आणि केविन ब्राईट हे कार्यकारी निर्माते होते. नंतरच्या भागांमध्ये ऍडम चेस, माईकेल कर्टिस, ग्रेग मॅलिन्स, स्कॉट सिल्वेरी, शाना गोल्डबर्ग-मीहान, अँड्रिव्ह रेईच आणि टेड कोहेन यांनी देखील निर्मितीची सूत्रे सांभाळली.
या मालिकेत १० सिझन तर २३६ भाग आहेत. ही मालिका दर गुरुवारी प्रक्षेपित होत होते.
फ्रेंड्स
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.