फ्रीडरिश फॉन वीजर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फ्रेडरिक फॉन वीजर (जर्मन: Friedrich von Wieser ; १० जुलै, १८५१ – २२ जुलै, १९२६) हे ऑस्ट्रियन अर्थशास्त्रअचे आद्य-काळातील ("पहिल्या पिढीतील") अर्थशास्त्रज्ञ होते. व्हिएन्ना येथे जन्मलेले, ते युद्ध मंत्रालयातील एक उच्च अधिकारी आणि प्रिव्ही कौन्सिलर लिओपोल्ड फॉन वीजर यांचे पुत्र होते. त्यांनी सुरुवातीला समाजशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले. १८७२ मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी ऑस्ट्रियन शाखेचे संस्थापक कार्ल मेंगर यांच्या ग्रुंडसेट्झ (Grundsätze)' हे पुस्तक वाचले झाला आणि त्यांची आवड अर्थशास्त्रीय सिद्धांताकडे वळली. वीजर यांनी १९०३ मध्ये व्हियेना येथे मेंगरच्यानंतर पदभार स्वीकारेपर्यंत व्हियेना आणि प्राग विद्यापीठांमध्ये काम केले. व्हियेनामध्ये त्यांचे मेहुणे एउगेन फॉन बोम-बावेर्क यांच्यासोबत १८९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला लुडविग फॉन मिसेस, फ्रीडरिश हायेक आणि योसेफ शुम्पीटर यांच्यासह ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांच्या पुढील पिढीवर प्रभाव पडला. ते ३० ऑगस्ट १९१७ ते ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत ऑस्ट्रियाचे वाणिज्य मंत्री होते.



वीजर हे त्यांच्या दोन मुख्य कामांसाठी प्रसिद्ध आहेत: नैसर्गिक मूल्य (Der natürliche Werth) , ज्यात संधी-खर्च सिद्धांत आणि आरोपण सिद्धांताचे तपशीलवार वर्णन आहे; आणि त्यांचे पुस्तक सामाजिक अर्थशास्त्र (Theorie der gesellschaftlichen Wirtschaf), जे वास्तविक जगात ते लागू करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न होता. सीमांत उपयोगिता सिद्धांताचे त्यांचे स्पष्टीकरण, किमान पारिभाषिक दृष्ट्या, निर्णायक होते. त्यांची ग्रेंन्झुट्झेन(Grenznutzen‌) (फॉन थुनेनच्या ग्रेन्झकोस्टेन (Grenzkosten) वर आधारित) ज्यातून 'सीमान्त उपयोगिता' ही प्रमाणित संज्ञा विकसित झाली, विल्यम स्टॅनले जेव्हन्सच्या 'अंतिम उपयोगिता पातळी' किंवा मेंगरच्या 'मूल्य' यातून नव्हे. 'नैसर्गिक' या विशेषणाचा त्यांचा वापर हे दाखवतो की, मालमत्तेच्या कोणत्याही संस्था स्थापित झाल्या असल्या तरी, ते मूल्याला एक 'नैसर्गिक श्रेणी' मानत होते, जी कोणत्याही समाजाला लागू होईल.

आर्थिक कार्यक्षमतेसाठी अचूक गणनेचे अति महत्त्व असणे, या संकल्पनेतून आर्थिक गणनेवरील वादविवाद सुरू झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या मते किमती या बाजारपेठेच्या परिस्थितीबद्दलची माहिती दाखवतात आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कार्यासाठी त्या आवश्यक आहेत. त्यामुळे, समाजवादी अर्थव्यवस्थेला कार्य करण्यास किंमत प्रणालीची आवश्यकता असेल. त्यांनी आर्थिक बदलासाठी उद्योजकाच्या महत्त्वावरही भर दिला, जो बदल "नवीन आर्थिक सीमांकडे नेते म्हणून पुढे येणाऱ्या व्यक्तींच्या धाडसी हस्तक्षेपाने" घडून येतो, असे त्यांना वाटत होते. नेतृत्वाची ही कल्पना नंतर योसेफ शुम्पीटर यांनी त्यांच्या आर्थिक नवोपक्रमाच्या विवेचनात उचलून धरली.

ऑस्ट्रियन मतवादाच्या इतर बहुतेक अर्थशास्त्रज्ञांच्या विपरीत, वीजर यांनी शास्त्रीय उदारमतवाद नाकारला आणि लिहिले की, "स्वातंत्र्याची जागा सुव्यवस्थेच्या प्रणालीने घेतली पाहिजे". ही दृष्टी आणि इतिहासातील व्यक्तीच्या भूमिकेवरील त्यांचा सर्वसाधारण उपाय, त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात प्रकाशित झालेल्या कायदेची ताकद (Das Gesetz der Macht‌) या शेवटच्या पुस्तकात सर्वोत्तम प्रकारे व्यक्त झाला आहे; हे पुस्तक राजकीय व्यवस्थेचे एक समाजशास्त्रीय परीक्षण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →