फोषान (देवनागरी लेखनभेद : फोशान) हे चीन देशाच्या आग्नेय भागातील क्वांगतोंग ह्या प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मोती नदी खोऱ्याच्या पश्चिम भागात क्वांगचौच्या वायव्येस वसले असून ते क्वांगतोंग-षेंचेन महानगर क्षेत्राचा भाग मानले जाते. २०२० साली फोषान शहराची लोकसंख्या सुमारे ९५ लाख होती. फोषान येथे पारंपारिक मँडेरिन भाषेसोबत कॅंटोनीज भाषा देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फोषान
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.