दोंगुवान (देवनागरी लेखनभेद : दोंग्वान) हे चीन देशाच्या आग्नेय भागातील क्वांगतोंग ह्या प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मोती नदीच्या खोऱ्यामध्ये क्वांगचौच्या दक्षिणेस तर षेंचेनच्या उत्तरेस वसले असून २०२० साली दोंगुवान शहराची महानगरी लोकसंख्या सुमारे १ कोटी ४ लाख इतकी होती.
आजच्या घडीला दोंगुवान चीनमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून ते एक प्रगत व सुबत्त शहर म्हणून ओळखले जाते. येथील दोंगुवान इंटरनॅशनल ट्रेड सेंटर १ ही जगातील सर्वाधिक उंच इमारतींमध्ये गणली जाते तसेच जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल दोंगुवान येथेच बांधला गेला आहे.
दोंगुवान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.