फॅमिली मॅटर्स (कोरियन) ही २०२४ मधील दक्षिण कोरियन थ्रिलर टेलिव्हिजन मालिका आहे. ज्यामध्ये बे डूना, रयू सेउंग-बम, बेक यून-सिक, लोमोन आणि ली सू-ह्यून यांनी अभिनय केला आहे. ही मालिका एका महिलेबद्दल आहे. तीला लहानपणी एका अज्ञात सुविधेत कठोर प्रशिक्षण मिळाले होते. नंतर ती सुविधेतून पळून जाते आणि कुटुंबातील एका सामान्य सदस्यासारखे राहते. परंतु यादरम्यान तिला क्रूर खलनायकांचा सामना करावा लागतो ती त्यांना आणखी क्रूर आणि विचित्र पद्धतींने शिक्षा देत असते. ही मालिका २९ नोव्हेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान दर शुक्रवारी रात्री १०:०० वाजता ( केएसटी ) कूपांग प्लेवर प्रदर्शित झाली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फॅमिली मॅटर्स (दूरचित्रवाणी मालिका)
या विषयावर तज्ञ बना.